SSC CGL Bharti 2025 भारत सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये तसेच शासकीय विभागांमध्ये गट ‘B’ आणि गट ‘C’ मधील एकूण 14,582 पदांसाठी भरतीसाठी कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा (CGL) 2025 आयोजित केली जात आहे. ही भरती प्रक्रिया पदवीधर तरुणांसाठी सरकारी सेवेत सामील होण्याची एक अत्यंत प्रतिष्ठित आणि मोठ्या प्रमाणात संधी देणारी आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. भरतीची सविस्तर जाहिरात SSC च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरात PDF आणि अर्ज लिंक खाली दिल्या आहेत.
SSC CGL Bharti 2025 भरतीचा तपशील:
भरती प्राधिकरण: कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission)
भरती प्रकार: केंद्र सरकारी नोकरी
पदांचा एकूण आकडा: 14,582 पदांसाठी भरती होणार
भरती विभाग: केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये व विभाग
श्रेणी: गट ‘B’ आणि गट ‘C’
शैक्षणिक पात्रता आणि पगार:
शैक्षणिक पात्रता: पदाच्या गरजेनुसार पदवीधर असणे आवश्यक (तपशील जाहिरातीत)
वेतनश्रेणी: दरमहा ₹25,500 ते ₹1,42,400 पर्यंत (पदानुसार)
पदांची नावे (प्रमुख):
- सहाय्यक विभाग अधिकारी
- निरीक्षक
- सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी
- उपनिरीक्षक
- कार्यकारी सहाय्यक
- संशोधन सहाय्यक
- विभागीय लेखापाल
- कनिष्ठ गुप्तचर अधिकारी
- कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
- लेखा परीक्षक
- लेखापाल / कनिष्ठ लेखापाल
- पोस्टल सहाय्यक / वर्गीकरण सहाय्यक
- वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च विभाग लिपिक
- वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक
- कर सहाय्यक
अर्ज प्रक्रिया: फक्त ऑनलाईन (Online)
वयोमर्यादा: 18 ते 32 वर्षे (शासन नियमांनुसार सवलत लागू)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतात विविध कार्यालयांमध्ये
नोकरी प्रकार: कायमस्वरूपी (Permanent)
परीक्षा शुल्क: ₹100 (SC/ST/PWD/महिला उमेदवारांना सूट लागू)
अर्ज सुरू होण्याची तारीख: 09 जून 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 04 जुलै 2025
महत्वाच्या सूचना:
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज करताना सर्व आवश्यक दस्तऐवज योग्य फॉरमॅटमध्ये अपलोड करावेत.
- अर्ज प्रक्रिया आणि परीक्षा संदर्भातील सर्व अटी व नियम SSC च्या वेबसाइटवरून तपासावेत.
- अधिक माहितीसाठी अधिकृत लिंक आणि PDF जाहिरात खाली दिलेली आहे.
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |