Mahavitaran Apprentice Bharti 2025 महावितरण मध्ये विविध नवीन पदाचे भरतीची जाहिरात नुकतीच जाहीर झालेली आहे. महावितरण मध्ये अप्रेंटिस पदाची भरती होत असते. या भरतीमध्ये विविध जागा भरल्या जात आहे. भरतीमध्ये 16 ते 17 जून या दरम्यान कागदपत्रे करण्याची शेवटची तारीख आहे. आणि या ठिकाणी ऑनलाईन अर्ज कसा करायचा.? पीडीएफ जाहिरात आणि भरती संदर्भातील इतर माहिती देण्यात आलेली आहे.
महावितरण मध्ये विविध नवीन पदाची महावितरण अंतर्गत आहिल्या नगर या ठिकाणी भरती जाहीर झालेली आहे. या भरतीमध्ये 10वी उत्तीर्ण आणि 55% गुणासह आयटीआय मध्ये उत्तीर्ण असलेली उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज सादर करू शकतात. या भरतीसाठी अर्ज कसे करायचे .? भरतीची इतर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Mahavitaran Apprentice Bharti 2025 Details
भरती विभाग : महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध 321 जागांची भरती या अंतर्गत जारी करण्यात आलेली आहे.
पदाचे नाव : लाईनमन अप्रेंटिस, कॉम्पुटर ऑपरेटर अप्रेंटिस
पद संख्या : वरील पदासाठी एकूण 321 जागा या भरण्यात येत आहे.
शैक्षणिक पात्रता : पदानुसार पात्रता वेगवेगळी आहे, यामध्ये दहावी उत्तीर्ण आणि 55% गुणासह आयटीआय एनसीवीटी यामध्ये वीजतंत्री/तारतंत्री, सीओपीए आणि मागासवर्गीय यांना 50% गुण असणे या ठिकाणी आवश्यक असणार आहे.
वयोमर्यादा : वरील पदांचा अर्ज करण्यासाठी 18 ते 30 वर्ष आणि मागासवर्गीय उमेदवारांकरिता 05 वर्ष अतिरिक्त सुट्टी या ठिकाणी मिळणार आहे.
नोकरी ठिकाण : उमेदवारांची वरील पदांकरिता निवड झाल्यानंतर त्यांना अहिल्यानगर (अहमदनगर) या ठिकाणी नोकरी करावी लागणार आहे.
अर्ज शुल्क : वरील पदांसाठीच्या कोणतेही (फ्री) निशुल्क आहेत.
कागदपत्रे सादर करण्यासाठी पत्ता : अधीक्षक अभियंता, म. रा. वि. वि. कं. मर्यादित मंडळ कार्यालय विद्युत भवन स्टेशन रोड अहिल्यानगर – 414001 या पत्त्यांवर कागदपत्रे सादर करणे आवश्यक असेल.
कागदपत्रे सादर करण्याची तारीख : 16 ते 17 जून आहेत, अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात पहावी.
मित्रांनो ही होती या ठिकाणी महावितरण मध्ये 02 पदासाठी एकूण 321 जागांची भरती या भरतीमध्ये इतर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली देण्यात आली पीडीएफ जाहिरात आणि इतर माहिती पहावी त्यानंतर अर्ज करावा.