Konkan Railway Recruitment अंतर्गत कोकण रेल्वेत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी अर्ज करण्यासाठी थेट मुलाखतीला हजर राहावे लागणार आहे. ही मुलाखत 12, 15, 16 आणि 18 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 09:00 ते दुपारी 12:00 वाजेपर्यंत आयोजित केली आहे.
उपलब्ध पदे आणि जागांची संख्या
या भरतीमध्ये एकूण 80 रिक्त पदे जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये असिस्टंट इलेक्ट्रिकल इंजिनिअर, सिनियर टेक्निकल असिस्टंट/ELE, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट/ELE आणि टेक्निकल असिस्टंट/ELE या पदांचा समावेश आहे. असिस्टंट इलेक्ट्रिकल इंजिनिअर पदासाठी 10 जागा, सिनियर टेक्निकल असिस्टंट/ELE साठी 19 जागा, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट/ELE साठी 21 जागा आणि टेक्निकल असिस्टंट/ELE साठी 30 जागा उपलब्ध आहेत.
शैक्षणिक पात्रता व अनुभव
असिस्टंट इलेक्ट्रिकल इंजिनिअर पदासाठी उमेदवाराकडे इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची पदवी किंवा डिप्लोमा किमान 60% गुणांसह असणे आवश्यक आहे. तसेच किमान 6 ते 8 वर्षांचा अनुभवही हवा. सिनियर टेक्निकल असिस्टंट/ELE साठी पदवी किंवा डिप्लोमा किमान 60% गुणांसह आवश्यक असून 1 ते 3 वर्षांचा अनुभव अपेक्षित आहे. ज्युनियर टेक्निकल असिस्टंट/ELE पदासाठी किमान 60% गुणांसह इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स पदवी किंवा डिप्लोमा आणि 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. तर टेक्निकल असिस्टंट/ELE पदासाठी कोणत्याही ट्रेडमधील ITI आवश्यक असून 3 वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक आहे.
वयोमर्यादा व शुल्क
या भरतीसाठी उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2025 रोजी 35 ते 45 वर्षांच्या दरम्यान असावे. अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
मुलाखतीचे ठिकाण
उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी Executive Club, Konkan Rail Vihar, Konkan Railway Corporation Ltd., Seawoods (West), Sector-40, Navi Mumbai येथे हजर राहावे. मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक आहे.
नोकरीचे ठिकाण : निवड झालेल्या उमेदवारांची नेमणूक संपूर्ण भारतात करण्यात येईल.
Disclaimer: ही भरतीविषयक माहिती अधिकृत Konkan Railway Corporation Ltd. द्वारे प्रकाशित जाहिरातीवर आधारित आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळ आणि जाहिरात तपासून पाहावी. आमच्या पोर्टलवरील माहिती केवळ जनसंपर्कासाठी आहे.