CISF Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सीआयएसएफ मध्ये नवीन पदासाठी 10वी पासवर भरती निघालेली आहे या भरतीमध्ये पगार थेट 69 हजार रुपये पर्यंत तुम्हाला मिळणार आहे, भरतीसाठी अर्ज कसा करायचा ? त्यानंतर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, नोकरी ठिकाण, आणि भरती संदर्भातील सविस्तर माहितीसाठी खाली देण्यात आलेली माहिती वाचावी.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF अंतर्गत कॉन्स्टेबल आणि ट्रेडर्स मध्ये या पदासाठी नवीन भरती निघालेली आहे एकूण 1161 जागा दहावी पास उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतील निवड झालेल्या उमेदवारांना 69 हजार पर्यंतचा पगार मिळणार आहे अधिक माहितीसाठी खालील माहिती वाचा.
भरती विभाग : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा अंतर्गत भरती होत आहे
भरती श्रेणी : केंद्र सरकार द्वारे सीएसएफ अंतर्गत भरती
पदाचे नाव : कॉन्स्टेबल, ट्रेडसमन विविध कॅटेगिरी मध्ये आहे
शैक्षणिक पात्रता : पदांनुसार वेगवेगळी आहे, यासाठी दहावी व इतर पात्रताधारण केलेली उमेदवार अर्ज करू शकतील ऑनलाइन अर्ज प्राप्त होण्याच्या शेवटच्या तारखेला किंवा त्यापूर्वी कुशल व्यवसायांसाठी मान्यता प्राप्त मंडळाकडून मॅट्रिक्युलेशन किंवा त्याच्या समक्ष म्हणजेच नाव्ही,बूट, बनविणारा मोची, शिंपी, स्वयंपाकी, गवंडी, माळी, रंगारी, प्लंबर, वॉशर मॅन, आणि वेल्डर यासाठीची औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना प्राधान्य मिळणार आहे अधिक माहितीसाठी उपयोग जाहिरात वाचा
अर्ज सुरु होण्याची तारीख : 5 मार्च 2025 पासून अर्ज सुरू होतील
भरती कालावधी : वरील पदासाठी सीआयएसएफमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळवण्याचे संधी आहे.
वयोमर्यादा : 18 तेथे 23 वर्षे वय असलेले उमेदवार सदर भरतीसाठी अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची पद्धत : CISF अंतर्गत पदांसाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आलेले आहेत
पद संख्या : एकूण 1161 रिक्त जागांची भरती या ठिकाणी केली जात आहे
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार आणि नियमानुसार 21 हजार 700 पासून ते 69 हजार 100 रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
नोकरी ठिकाण : निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात कुठेही नोकरी करावी लागेल
महत्त्वाची सूचना : शारीरिक कार्यक्षमता चाचणी / शारीरिक मानक चाचणी / दस्तऐवजीकरण / व्यापार चाचणी, लेखी परीक्षा, वैद्यकीय परीक्षा नियोजित आणि आयोजित केला जाणार आहे अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहा परीक्षेच्या प्रक्रियेचे आद्यतांसाठी उमेदवारांना नियमितपणे वेबसाईटला भेट देण्याच्या आणि परीक्षेच्या प्रत्येक टप्पेसाठी प्रवेश पत्र मिळवण्यासाठीचा सल्ला मिळतो आणि अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.
परीक्षेच्या कोणत्या टप्प्यासाठी प्रवेश पत्र पोस्टाने पाठवले जाणार नाही प्रवेशपत्र तुम्हाला ऑनलाईनच अधिकृत संकेतस्थळावरून मिळवावे लागेल. रिक्त पदांपैकी 1.8 10% जागा प्राधान्याने महिला उमेदवारांना दिले जाणार आहेत अपात्र झाल्यास पुरुष उमेदवार भरतील असे या ठिकाणी सांगण्यात येत आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 3 एप्रिल 2025 आहे या तारखेपर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता
मित्रांनो ही होती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल या अंतर्गत एकूण 1161 पदाची नवीन भरती दहावी उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतील वरील माहिती मध्ये काही चुकी असू शकते त्यामुळे पीडीएफ जाहिरात पहावी.
त्यानंतर अर्ज करावेत वरील महत्त्वाची सूचना वरील पदासाठी जे कोणी उमेदवार अर्ज करत असतील त्यांनी अधिकृत जाहिरात पाहूनच अर्ज करावेत इतर भरती संदर्भातील कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाईट आणि लेखक जबाबदार राहणार नाही धन्यवाद.