BEL Recruitment 2025 भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ने 2025 साली नवीन भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 07 ऑक्टोबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 610 पदे भरण्यात येणार आहेत.
पदांची माहिती
या भरतीत सर्वाधिक मागणी असलेले पद म्हणजे ट्रेनी इंजिनिअर-I आहे. TEBG मध्ये 488 पदे आणि TEEM मध्ये 122 पदांसह एकूण 610 जागा उपलब्ध आहेत.
शैक्षणिक पात्रता
अर्जदाराने BE/B.Tech/B.Sc (Electronics/Mechanical/Computer Science/Electrical) या शाखांपैकी कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा
1 सप्टेंबर 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. मागास प्रवर्गासाठी शासन नियमाप्रमाणे सूट देण्यात आली आहे. SC/ST उमेदवारांना 5 वर्षे व OBC उमेदवारांना 3 वर्षांची वयोमर्यादेत सूट लागू आहे.
अर्ज फी
जनरल, ओबीसी आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांना ₹177/- इतकी परीक्षा फी भरावी लागणार आहे. SC, ST, PWD आणि माजी सैनिकांसाठी फी पूर्णपणे माफ आहे.
पगार श्रेणी
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹30,000/- ते ₹40,000/- इतका मानधन मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण
निवड झाल्यानंतर उमेदवारांची नेमणूक संपूर्ण भारतातील विविध प्रकल्पांमध्ये केली जाईल.
अर्ज प्रक्रिया व परीक्षा
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2025 असून, लेखी परीक्षा 25 व 26 ऑक्टोबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे.
अधिक माहिती व अधिकृत जाहिरातीसाठी उमेदवारांनी BEL च्या संकेतस्थळास भेट द्यावी – https://bel-india.in/homepage/
Disclaimer
या भरतीविषयीची माहिती ही अधिकृत जाहिरात व BEL च्या संकेतस्थळावर आधारित आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अद्ययावत माहिती व मार्गदर्शक तत्त्वे तपासावीत.